breaking-newsराष्ट्रिय

ऑगस्ट महिन्यात २५ वर्षातील सर्वांत उच्चांकी पाऊस

नवी दिल्ली – देशात यंदाच्या पावसाळ्यात ८८० मिमी पाऊस सरासरी समजला जात आहे. पावसाळ्यातील ८८ दिवसांत ७४० मिमी पाऊस बरसला आहे. म्हणजेच सरासरीचा ८१ टक्के पाऊस झाला आहे. मान्सूनच्या परतीस अजून २० दिवस आहेत. हवामान खात्यानुसार, हा सिलसिला असाच कायम राहिला तर यंदा सरासरीपेक्षा ४ ते ६ टक्के जास्त पाऊस होऊ शकतो. ऑगस्टमध्येच १२३ टक्के पाऊस झाला असून तो २५ वर्षांचा उच्चांक असल्याचे हवामान खात्याचे महासंचालक डॉ.स मृत्युंजय महापात्रा यांनी म्हटले आहे.

महापात्रा पुढे म्हणाले की, ३, ९, १३, १९ व २४ ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो ओडिशापासून सुरू होत छत्तीसगड, महाराष्ट्रमार्गे गुजरातपर्यंत पसरला आहे. हा पट्टा वारंवार तयार होणे व तो मान्सून टर्फसोबत भिडल्याने यंदा अचानक मुसळधार पावसाऐवजी अनेक तास रिमझिम पावसाचा ट्रेंड दिसला आहे. ३६ उपविभागांपैकी फक्त ४ मध्ये कमी पावसाची नोंद पोखरणहून १७ सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीचा प्रारंभ होईल. तो देशभरात १५ ऑक्टोबरपर्यंत थांबेल. हवामान खात्याच्या ३६ उपविभागांपैकी ३२ मध्ये आजवर सरासरी वा त्याहून जास्त पाऊस झाला आहे.

चारच उपविभागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली होती. गेल्या ५० वर्षांत फक्त ५ वेळाच मान्सूनमध्ये अतिवर्षाव हवामान खात्यानुसार, मान्सूनमध्ये जेव्हा पाऊस सरासरीच्या ९० टक्के वा त्यापेक्षा कमी होतो तेव्हा मान्सूनची तूट म्हटले जाते. जेव्हा पाऊस ११० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त होतो तेव्हा त्याला अतिवृष्टीचे वर्ष असे संबोधले जाते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button