breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारतात हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तान एजंटच्या शोधात

नाशिक – भारतात हेरगिरी करता यावी याकरता पाकिस्तान भारतात एजंट शोधत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या तपासात ही बाब उघडकीस आली. दरम्यान, गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये देवळाली कॅम्प आणि हिंदुस्थान अरोनॅटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलमध्ये हेरगिरी केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. या दोन्ही घटनांच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या तपासातून असं समोर आलं आहे की, असंतुष्ट आणि साध्या लोकांना या जाळ्यात अडकवण्यात येत आहे. यासाठी हनी ट्रॅप आणि इतर मार्गांचा अवलंब केला जात आहे. एच ए एल मधील कर्मचारी दीपक शिरसाट हा दोन वर्षांपूर्वी हनी ट्रॅपचा शिकार झाला होता. तेव्हापासून तो लढाऊ विमान बांधणी, आणि इतर संवेदनशील प्रकल्पाची माहिती आयएसआयच्या एजंटकडे पोहोचवीत होता. या काळात त्याने बरीच महत्वपूर्ण माहिती पाकिस्तानपर्यंत पोचविली आहे. तर दुसरीकडे देवळाली कॅम्प येथील तोफखाना केंद्रात एका बांधकामच्या साईटवर कंत्राटी काम करणारा संजीव कुमार सहा महिन्यापूर्वी पाकिस्तान एजन्सीच्या जाळयात अडकला होता. सुरुवातीला त्याच्याशी भांडण करण्याचा बनाव रचला आणि नंतर मैत्री वाढवून माहिती घायला सुरवात केली. त्यानेही तोफखाना केंद्राचे फोटो पाकिस्तान मध्ये पाठवले, पण लष्करी जवानांच्या सतर्कतेमुळे पाकिस्तानी मनसुबे उधळले गेलेत.

हनी ट्रॅपमध्ये अडकून नये याकरता काय कराल?

देशातील नागरिकांशी संवाद साधताना सावधानता बाळगावी.
इतर देशातील अनोळखी नागरिकांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेऊ नये,.
शहरातील देशाच्या सुरक्षेशी संदर्भात असणाऱ्या आस्थापनांच्या परिसरात स्मार्टफोन वापरण्यास बंदी घालावी, असे पत्र नाशिक पोलिसांनी आस्थापनांना दिल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त पांडे यांनी दिली आहे.
कसा अडकला दीपक शिरसाट

दहशतवादी विरोधी पथक नाशिक युनिटला अतिशय गोपनीय माहिती मिळाली की, भारतीय एरोनॉटिकलमध्ये काम करणारा एक व्यक्ती पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयला अतिशय गोपनीय माहिती पुरवत आहे. माहितीचा गांभीर्य लक्षात घेता दहशतवादी विरोधी पथक सक्रिय झालं आणि हा व्यक्ती नेमका कोण आहे याच्या शोधात लागले. हा माहिती पुरवणारा व्यक्ती इंडियन एरोनॉटिकल लिमिटेडचा कर्मचारी दीपक शिरसाट होता. दीपक याला हॅनीट्रप मध्ये पाकिस्तानी इंटलीजन्स एजन्सी आयएसआयने अडकवले. आरोपी शिरसाटने भारतीय लढाऊ विमानांविषयी गुप्त माहिती तसेच इतर संवेदनशील माहिती आयएसआयला दिल्याचा आरोप आहे. MiG-21FL, MiG-21M, MiG-21 BIS, MiG-27, Su-30 MKI फायटर जेट, K-13 मिसाइल सारख्या महत्त्वपूर्ण जेट आणि मिसाइलबद्दल पाकिस्तानी एजन्सी आयएसआयला माहिती दिली. दिपकला या जाळात अडकवण्यासाठी एक सुंदर मुलीचा वापर केला गेला. हसीना नावाच्या मुलीने जानेवारी 2019 मध्ये सोशल मीडीयावर दीपकशी मैत्री केली. काही महिन्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. या हसीनानं दिपकला इमोशनली कनेक्ट केलं. या मुलीने दिपकचा विश्वास जिंकला आणि हळूहळू त्याच्या बद्दल सगळी माहिती घेतली. या मुलीने दिपकच्या मदतीने एचएएलच्या आत काय चालत याची माहिती घेतली पण तिला आतले फोटो, व्हिडियो आणि इतर माहिती हवी होती. त्यामुळे तीने दिपक सोबत ॲानलाइन अश्लील गोष्टी करायला सुरुवात केली. त्या मुलीने दिपकचे फोटो व्हिडीयो काढले आणि नंतर त्याला ब्लॅकमेल केलं. दीपकने भीतीपोटी 6 महिन्यापर्यंत हसीनाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पुरवल्या. नंतरही माहिती पुरवणार होता पण त्याआधी एटीएसला माहिती मिळाली आणि त्याला अटक केली गेली. दिपकने पोलिसांना सांगितले की, त्याने एचएएलबद्दलही सगळी माहिती त्याने तिला पोहोचवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button