breaking-newsपुणे

भारताचे माजी नौदलप्रमुख जयंत नाडकर्णी यांचे निधन

भारताचे माजी नौदलप्रमुख अॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी यांचे सोमवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. जयंत नाडकर्णी भारताचे १४ वे नौदल प्रमुख होते. डिसेंबर १९८७ ते नोव्हेंबर १९९० पर्यंत त्यांनी नौदलप्रमुख म्हणून धुरा संभाळली. कुलाब्यातील नौदलाच्या आयएनएचएस अश्वनी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जयंत नाडकर्णी यांना दोन मुले असून त्यांचा एक मुलगा भारतीय नौदलात रियर अॅडमिरल पदावर कार्यरत आहे. नौदल सेवेतून निवृत्त झाल्यानंतर जयंत नाडकर्णी पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांच्या पत्नी विमल नाडकर्णी यांचे २०१६ मध्ये निधन झाले. जयंत नाडकर्णी यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी चार वाजता पुण्यातील गोळीबार मैदान येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button