breaking-newsराष्ट्रिय

येडियुरप्पांनी स्वताचेच रेकॉर्ड मोडले

बंगळुरू – कर्नाटकात सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदावर राहण्याचे रेकॉर्ड येडियुरप्पा यांच्याच नावावर होते. यापुर्वी एकदा ते केवळ सात दिवस मुख्यमंत्री होते. पण आज सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदी राहण्याचे स्वताचेच रेकॉर्ड त्यांनी मोडले आहे. यावेळी केवळ दोन दिवसांसाठीच येडियुरप्पा मुख्यमंत्री बनू शकले. ही बाब निदर्शनाला आणून कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

सुर्जेवाला म्हणाले की भाजपचे ऑपरेशन लोटस अपयशी ठरले आहे. कर्नाटक विधानसभा हायजॅक करण्याचा त्यांचा डाव त्यांच्याच अंगलट आला आहे. कॉंग्रेस-जेडीएसच्या या विजयावर अन्य नेत्यांच्याही प्रतिक्रीया प्राप्त झाल्या असून तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जेडीएस आणि कॉंग्रेस चे अभिनंदन करताना हा रिजनल फ्रंटचा विजय असल्याची सूचक प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.

भाजपपासून अलिकडेच फारकत घेतलेले आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही या निकालाबाबत प्रतिक्रीया देताना भाजपवर निशाणा साधण्याची संधी घेतली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या सत्तलालसेला यातून लगाम घातला गेला आहे अशी प्रतिक्रीया देताना भाजप यातून काही धडा शिकणार आहे काय असा सवाल त्यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button