breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप नगरसेवकाला सत्तेची मस्ती; पालिका कर्मचा-याच्या कानशिलात भडकावली

  • सफाई कर्मचा-यांच्या कडक पावित्र्यानंतर पोलिसांची भूमिका मवाळ
  • नगरसेवक उत्तम केंदळे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या औषध फवारणी करणा-या कर्मचा-याच्या कानशिलात लगावल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सत्तेची मस्ती चढल्याने केंदळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सफाई कर्मचा-यांनी यमुनानगर पोलीस चौकीत ठिय्या मांडला. त्यानंतर पोलिसांनी मवाळ भूमिका घेऊन अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. हा प्रकार आज गुरुवारी (दि. 25) सकाळी दहाच्या सुमारास यमुनानगरमध्ये घडला.

गणेश जगताप असे मारहाण झालेल्या सफाई कर्मचा-याचे नाव आहे. जगताप हे महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. औषध फवारणी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. जगताप आज सकाळी निगडी, यमुनानगरमध्ये औषध फवारणी करत होते. त्यावेळी तिथे आलेले भाजपचे स्थानिक नगरसेवक उत्तम केंदळे यांनी आपल्या कानशिलात लगावली. तसेच, हात देखील पिरगळला, असे जगताप यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी सफाई कर्मचा-यांनी यमुनानगर चौकीत ठिय्या मांडला होता.

नगरसेवक उत्तम केंदळे म्हणाले, यमुनानगर परिसरात गेल्या तीन महिन्यापासून औषधाची फवारणी केली नाही. त्यामुळे साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. जगताप हा फवारणी करण्याऐवजी झाडाखाली बसला होता. तसेच, उद्धटपणे बोलला. त्यामुळे मी त्यांच्या कानाखाली मारल्या आहेत’.

या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे, फौजदार एस. वाय. होळकर यांनी सांगितले होते. अखेर केंदळे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button