breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

महेशदादांसारखा राजकीय मार्गदर्शक मिळाला हा माझा अभिमान : नगरसेविकास सुवर्णा बुर्डे

  • चऱ्होली येथे ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला रसिकांची तोबा गंर्दी
  • आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

पिंपरी । प्रतिनिधी

महिलांना राजकीय क्षेत्रात करिअर करताना चांगल्या गुरु-मार्गदर्शकाची आवश्यकता असते. आमदार महेशदादा लांडगे यांच्यासारखा पाठीराखा मार्गदर्शक आणि भाऊ मिळाला हा माझा अभिमान आहे, अशा भावना नगरेविकास सुवर्णा बुर्डे यांनी व्यक्त केल्या.

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त चऱ्होली येथे ‘होम मिनिस्टर’ या मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक नितीन काळजे, नगरसेविका साधना तापकीर, अश्विनी जाधव, निर्मला गायकवाड, स्वीनल म्हेत्रे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या कोषाध्यक्षा शैला मोळक, अजित बुर्डे, नंदू दाभाडे, विजय फुगे, दत्ता तापकीर, सचिन तापकीर, बाळासाहेब मोळक आदी उपस्थित होते.

वाघेश्वर महाराज घाट, चऱ्होली गावठाण येथे आयोजित केलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात पहिली बक्षीस स्कूटर ठेवण्यात आले. त्यानंतर लॅपटॉप, वॉशिंग मशीन, फ्रीज, मोबाईल, शीलाई मशीन अशी आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली होती. तसेच, कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. विशेष म्हणजे, ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अंजी आणि परश्या हे दोन कलाकार कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

  • माझ्या नगरसेवकांमुळे मी मोठा झालो : आमदार लांडगे

आमदार महेश लांडगे म्हणाले की, माजी महापौर, नगरसेवक नितीन काळजे आणि नगरसेविका सुवर्णा बुर्डे यांचे कार्य लक्षवेधी आहे. माझे नगरसेवक माझ्यामुळे मोठे नाहीत. तर माझ्या नगरसेवकांमुळे मी मोठा झालो आहे. मी मोठा असतो, तर कदाचित नितीन काळजे यांच्याअगोदर शहराचा महापौर झालो असतो. पण, ग्रामदैवत वाघेश्वर महाराज यांच्या मनात काही वेगळेच होते. त्यांनी माझ्या माध्यमातून चऱ्होलीच्या सुपूत्राला पिंपरी-चिंचवडचा महापौर बनवले. मी केवळ निमित्त होतो, अशा शब्दांत लांडगे यांनी भावना व्यक्त केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button