breaking-newsराष्ट्रिय

भाजपा सरकारमुळे लोकशाहीवरचा जनतेचा विश्वास दृढ झाला-अमित शाह

भाजपा सरकारने गेल्या पाच वर्षात जो विकास केला त्यामुळे लोकशाहीवरचा जनतेवरचा विश्वास दृढ झाला असे अमित शाह यांनी म्हटलं आहे. लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या प्रचाराच्या आज तोफा थंडावणार आहेत. आत्तापर्यंत भाजपाने केलेला प्रचार सर्वात मोठा प्रचार आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत यामागे होती असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

मोदी सरकार पुन्हा यावं यासाठी भाजपाच नाही तर जनताही प्रयत्नशील आहे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. भाजपाने आत्तापर्यंत अनेक चांगली कामं केली आहे. २०१४ मध्ये देशाच्या जनतेने आम्हाला बहुमत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. देशाची जनतेने तो प्रयोग केला होता. त्याला आम्ही नरेंद्र मोदी प्रयोग असे म्हणतात. त्यामुळे आम्ही तेव्हाच ठरवलं होता की २०१९ लाही असाच प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. भाजपाचे कार्यकर्ते आणि आम्हा सगळ्यांसाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पत्रकार परिषदेला हजर आहेत ही आनंदाची बाब ठरते आहे.

आमची पाच वर्षे संपत आली आहेत, नरेंद्र मोदी प्रयोग लोकांनी, देशाने स्वीकारला. यावेळीही बहुमताने आम्ही निवडून येऊ असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. भाजपाने दिल्लीत प्रचाराच्या तोफा थंडावण्याच्या आधी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत अमित शाह बोलत होते. नरेंद्र मोदी सरकारने दर १५ दिवसांनी एक नवी योजना आणली. याचा सरासरी आकडा १३३ योजनांपर्यंत पोहचला आहे. देशातले गरीब, शेतकरी, महिला, आदिवासी या सगळ्यांपर्यंत या योजना पोहचल्या आहेत. आमच्या सरकारमुळे लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास दृढ झाला.

२०१४ मध्ये आमच्याकडे ६ राज्यांची सत्ता होती. आता आमच्याकडे १९ राज्यांची सत्ता आहे. कारण आम्ही विकासाला महत्त्व दिलं. गरीबांचं, सामान्यांचं रहाणीमान कसं उंचावेल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले. आज पूर्ण जगभरात भारताचा डंका वाजू लागला आहे तो फक्त या सरकारने केलेल्या कामांमुळेच. देशात असुरक्षिततेची भावना नाही ही लोकांची भावना आहे हेच आमचं यश आहे असं आम्ही मानतो असंही अमित शाह म्हटले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button