breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

जगातील सर्वात जुनी कंपनी कोणती? वाचा संपुर्ण यादी..

Oldest Companies In The World : जगातील अशा कित्येक प्रसिद्ध कंपन्या आहेत ज्या अनेकांना माहीत आहेत, पण किती वर्षे जुन्या आहेत, हे फार कमी जणांना माहीत असेल. त्यापैकी काही कंपन्यांची म्हणजेच सोनी, सॅमसंग, नोकिया वगैरे कंपन्यांचे प्रॉडक्ट जसे की, अनुक्रमे टीव्ही, फ्रीज, मोबाईल देखील आपण वापरून पाहिले असतील. फक्त या इलेक्ट्रॉनिक कंपन्याच नव्हे, तर काही ‘रेनॉ’ सारख्या ऑटोमोबाईल कंपन्याही आहेत, ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत, ज्यातील तुमच्या आवडीच्या देखील काही आहेत.

सध्या अख्ख्या जगावर आपलं वर्चस्व गाजवणाऱ्या काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंपन्याही आहेत, ज्याद्वारे आपण आपल्या जवळील लोकांशी कनेक्ट होऊ शकतो. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने आपल्या जवळील नातेवाईक, मित्र-मैत्रिणींशी आपण गप्पागोष्टी करू शकतो, ऑडिओ कॉलच्या माध्यमातून ऐकू आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पाहूदेखील शकतो.

हेही वाचा – ‘बॅनरबाजी अन् पार्टी देऊन निवडणूक जिंकता येत नाही’; नितीन गडकरींचं विधान

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजेच इंस्टाग्राम, फेसबुक म्हणजेच आजचे मेटा, ट्विटर, व्हाट्सॲप यादेखील त्यापैकीच एक आहेत, तर मागील काही वर्षांपूर्वी जगभरात प्रसिद्ध झालेले आणि अल्पावधीतच कोट्यवधी युजर्स मिळविणारे ‘टिक टॉक’ देखील आज भारतात नसले तरी अनेकांच्या आठवणीत आहे.

जगभरात आपला बिजनेस वाढवणाऱ्या आणि आपले प्रॉडक्ट्स बहुतांश देशात पोहोचविणाऱ्या या कंपन्या किती जुन्या आहेत, हे तुम्हाला माहीती आहे का? नसेल माहीत तर हे माहीत होण्यासाठी ‘वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’ नुसार तुमची आवडती किंवा तुम्हाला माहीत असलेली कंपनी किती वर्षे जुनी आहे माहित करून घेऊयात..

कोणती कंपनी किती वर्षे जुनी?

  1. नोकिया : १५८ वर्षे
  2. तोशिबा : १४८ वर्षे
  3. निन्टेंडो : १३३ वर्षे
  4. कोका-कोला : १३१ वर्षे
  5. रेनॉ : १२४ वर्षे
  6. फिएट : १२४ वर्षे
  7. आयबीएम : ११२ वर्षे
  8. बीएमडब्ल्यू : १०७ वर्षे
  9. बोईंग : १०६ वर्षे
  10. सॅमसंग : ८५ वर्षे
  11. टाटा मोटर्स: ७७ वर्षे
  12. सोनी : ७७ वर्षे
  13. मायक्रोसॉफ्ट: ४८ वर्षे
  14. ॲपल : ४७ वर्षे
  15. ॲमेझॉन : २८ वर्षे
  16. नेटफ्लिक्स : २५ वर्षे
  17. गूगल : २४ वर्षे
  18. टेस्ला : १९ वर्षे
  19. फेसबुक : १९ वर्षे
  20. ट्विटर : १७ वर्षे
  21. एअरबीएनबी : १४ वर्षे
  22. इन्स्टाग्राम : १२ वर्षे
  23. टिक टॉक : ६ वर्षे
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button