breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपामध्ये अनेकांना ‘महाप्रसाद’ पण, काहीजण ‘तीर्थप्रसाद’पासूनही वंचित!

‘एक पद- एक नगरसेवक ’ चा अजेंडा आम्हाला लागू नाही!

पदांपासून वंचित नगरसेवकांची खंत, सर्वांना समान न्याय मिळेना

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे पदवाटप धोरण म्हणजे अनेकांना ‘महाप्रसाद’चा लाभ आणि काहीजण तीर्थ प्रसादापासूनही वंचित, अशी स्थिती झाले आहे. परिणामी, पदवाटपात समान ‘हक्क’ न मिळालेले नगरसेवक अस्वस्थ आहेत.

महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये भाजपाला पूर्ण बहुमत अर्थात ७७ जागा मिळाल्या आहेत. (नगरसेवक लक्ष्मण उंडे यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त आहे) त्या खालोखाल राष्ट्रवादी ३६ (नगरसेवक दत्ता साने व जावेद शेख यांच्या निधनानंतर दोन जागा रिक्त आहेत.) आणि शिवसेनेला ९ जागा मिळाल्या आहेत. अपक्ष ५ आणि मनसे १ अशा जागा मिळाल्या आहेत.

सर्वाधिक नगरसेवक असलेल्या भाजपच्या स्थानिक आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांनी ‘एक पद- एक नगरसेवक- एक वर्ष’ असे सूत्र राबवण्याचे ठरवले होते. त्यानुसार प्रत्येक वर्षी विविध विषय समित्यांचे सदस्य आणि मानाची पदे याची विभागणी करण्याचे धोरण ठरवले होते. सुरवातीचे वर्ष तसे धोरण राबवलेही मात्र, त्यानंतर भाजपाचा अजेंडा बदलला. एका-एका नगरसेवका चार-पाच पदे देण्यात आली आहेत. मात्र, नगरसेवक संदीप कस्पटे, संदीप वाघेरे असा काही नगरसेवकांना एकही पद अद्याप मिळालेले नाही.

दरम्यान, प्रदेश पातळीवरील नेत्यांनी स्थानिक राजकारणात अवास्तव हस्तक्षेप केल्यामुळे पदवाटपाचा बट्याबोळ झाला आहे, असा सूर आहे. पण, शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आपआपल्या विचारांच्या नगरसेवकांना ‘पुन्हा संधी देवू’ अशी समजूत काढून वेळ मारुन नेत आहेत, असे चित्र आहे.

नेत्यांची मर्जी सांभाळणाऱ्यांची चांदी…

पिंपरी-चिंचवडमधील भाजपाचे राम-लक्ष्मण अर्थात शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि  आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निकटवर्ती नगरसेवकांपैकी काहींना तीन- तीन पदे दिली आहेत, असे चर्चा आहे. लांडगे-जगताप किंवा वरिष्ठ नेत्यांची मर्जी सांभाळणाऱ्या नगरसेवकांना पदाचा लाभ मिळत आहे. पण, भाजपाच्या तिकीटावर निवडणून आलेल्या आणि पक्षाचे काम करणाऱ्या काही नगरसेवकांना सोईस्कर बाजूला ठेवले जात आहे, असा काहीसा सूर संबंधित नगरसेवकांचा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button