breaking-newsताज्या घडामोडी

#Covid-19 | मदरस्याची जागा आयसोलेशन वार्डसाठी देणार – मौलाना हारिस दस्तगीर

सोलापूर | एकीकडे दिल्लीतील निजामुद्दीनच्या तबलिगी जमातचा मुद्दा गाजत असताना सोलापुरातील मुस्लिम बांधवांनी सकारात्मक पाऊल उचलल्याचे दिसत आहे. शहरातील नई जिंदगी येथील चंद्रकला नगरमध्ये असलेल्या अल फुरकान मदरस्याची जागा दोन महिन्यांकरीता आयसोलेशन वार्डसाठी देण्याची घोषणा अल फुरकान एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष मौलाना हारिस दस्तगीर यांनी केली आहे.

कोरोना व्हायरस रोखण्याच्या प्रयत्नात आम्ही देशासोबत आहोत. आमच्या संस्थेद्वारे एक अरबी मदरसा चालवला जातो. चंद्रकला नगर येथील हा मदरसा सध्या लॉकडाऊनमुळे बंद आहे. त्यामुळे या मदरस्याची जागा आम्ही आयसोलेशन वार्डसाठी उपलब्ध करून देणार आहोत. मुहम्मद पैगंबरांच्या शिकवणीनुसार हे फार मोठे आणि पुण्याचे काम आहे.

त्यामुळे मदरसा सुरू होईपर्यंत सदरची जागा रुग्णांच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला असून त्याबाबतचा पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचीही मौलाना दस्तगीर यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button