breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भाजपने मित्र पक्षाला वापरुन फेकून दिले – अजित पवारांची टीका

इंदापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भिगवणमध्ये प्रचार सभा पार पडली. यावेळी अजित पवार यांनी भाजपाच्या मित्रपक्षांची चांगलीच खिल्ली उडवली.

आज भारतीय जनता पक्षाचे केवळ वापरायचे आणि फेकून द्यायचे असे काम चालले आहे. विनायक मेटे, महादेव जानकरांची बिकट अवस्था केली असून रामदास आठवले तर नुसत्या कविताचं म्हणत बसलेत त्यांना त्यांच्या पक्षाचे चिन्हंच सापडत नाही. तर सदाशिव खोतांची कडकनाथ कोंबडीने वाट लावलीय म्हणत भाजपच्या मित्र पक्षांची अजित पवारांनी खिल्ली उडवली. तर शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवले नाहीत आता तर मकेवर “भाजप अळी” नावाची एक अचानक नवीनच अळी आलीय अशा शब्दात कर्जमाफी वरुन सरकारवर निशाना साधला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button