breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बदलेला भारत घाबरत नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे – जगात बदल होत आहेत. गेल्या 100 दिवसांमध्ये नवीन भारताचा अनुभव होत आहेत. नव्या भारताचा आत्मविश्वास दिसत आहे. हा बदलेला भारत आहे. हा भारत घाबरणार नाही नसे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात व्यक्त केले.

आगामी विधानसभेच्या प्रचारसभेत ते पुण्यात बोलत आहेत. टिळक रस्त्यावरील एस पी महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा सुरु आहे. यावेळी व्यासपीठावर पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, आठही महादारसंघांचे उमेदवार आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते. भाषणाच्या सुरुवातील त्यांनी पुणेकरांनी यापूर्वी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल पुणेकरांचे आभार मानले. पुणे शहर देशातील युवकांना संस्कारांची शिकवण पण देते. छत्रपती शिवाजी महाराज,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, लोकमान्य टिळक, ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले अशा महापुरुषांच्या विचारांनी पुण्याला घडवलं आहे. ही वीरांच्या, ज्ञानवंतांची आणि समाज सुधारकांची भूमी आहे.
पुढे ते म्हणाले की, संपूर्ण देशात अभूतपूर्व बदल होत आहेत. अशा जगाशी डील करण्यासाठी सशक्त नेतृत्वाची गरज होती. नागरिकांनी पाच वर्षांसाठी सरकार निवडले आहे, अजून पाच महिनेही पूर्ण झालेले नाहीत. पण इतक्या कमी वेळात आम्ही पाच वर्षांचे काम केले. मागील शंभर दिवसात बदलत्या भारताचा अनुभव अनेकांना झाला असेल. जगताला मोठ्यात मोठा नेता जेव्हा माझ्याशी हस्तांदोलन करतो तेव्हा त्याला १३० कोटी भारतीय दिसतात.

त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • पुणे ते पंढरपूर पर्यंत पालखी महामार्ग करणार, अशा अनेक उपायांनी पुण्याची वाहतूक सुधारणार.
  • मेट्रोचे जाळे निर्माण केल्याने वाहतुकीच्या कोंडीची समस्या सुटेल. सुरक्षा, स्वच्छता आणि वेग अशा अनेक मुद्द्यांवर काम सुरु आहे.
    -वंद्य भारत सारख्या सुपरफास्ट रेल्वे गाड्या पुण्यातून सुरु करण्याचे संकल्प.
  • उदान योजनेने महाराष्ट्रातून नऊ विमानतळे जोड्लर आहेत.
  • मागील पाच वर्षांत देशातली गुंतवणूक पाचपट वाढली. सरकारने अनेक अर्थविषयक निर्णय घेतले. अधिक स्टार्ट अप तयार करण्यासाठी सरकारने कल्याणकारी निर्णय घेतले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button