breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

भाजपच्या सेवा सप्ताहानिमित्त दिव्यांगांना साहित्य वाटप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

”भाजप पिंपरी-चिंचवड सेवा सप्ताह 2020”निमित्त भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना व्हील चेअर, आधार काठी, वॉकर स्टँड साहित्य वाटप करण्यात आले. केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत शहरातील आठ पथ विक्रेत्यांना खेळते भांडवल म्हणून 10 हजार रुपयांचा चेक वितरित करण्यात आला.

यावेळी, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, माजी पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी अमित गोरखे, सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, अमोल थोरात, राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, उज्ज्वला गावडे, संकेत चोंधे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button