breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

काळबादेवी परिसरात ४ मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

मुंबई – मुंबईतील काळबादेवी परिसरात इमारतीचा काही भाग कोसळून ६१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. काल रात्री ही दुर्दैवी घटना घडली. ही इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले,. दरम्यान, या इमारतीची संपूर्ण माहिती गोळा करून नेमका हा अपघात कसा झाला याबद्दल चौकशी करण्यात येत आहे.

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर शौचालयाचे प्लास्टर आणि चौथ्या मजल्यावरचा भाग कोसळला आहे. तसेच इमारतीच्या अनेक भागांमध्ये भेगा पडल्या आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून म्हाडाच्या जवानांनी पोलिसांच्या मदतीने ही इमारत रिकामी केली असून इमारतीच्या आत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. जवळपास शंभर जणांना इमारतीतून बाहेर काढण्यात आले असल्याचे समजते आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button