breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात 24 तासांत 85,362 नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा भारतातील प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने आता 59 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे चिंता प्रचंड वाढली आहे. मागील 24 तासांत देशात 85 हजार 362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 1 हजार 89 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. यासह भारताची एकूण कोरोना रुग्णसंख्या 59 लाख 3 हजार 933 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 93 हजार 379 इतका झाला आहे. तसेच देशात आतापर्यंत 48 लाख 49 हजार 585 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 9 लाख 60 हजार 969 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

तसेच दुसरीकडे देशातील कोरोना चाचण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहे. २५ सप्टेंबरपर्यंत देशात एकूण ७ कोटी २ लाख ६९ हजार ९७५ नमूने तपासण्यात आले. दरम्यान, देशातील 7 राज्यांमध्ये कोरोनाची अधिक प्रकरणे समोर येत आहेत. यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब आणि दिल्लीचा समावेश आहे. त्यामुळे याठिकाणी कोरोनाचे नियम पाळणे आणि विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button