breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

संजय दत्तच्या ‘बाबा’ची फिल्मफेअर अवॉर्ड्स 2020 मध्ये बाजी

नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2020 मध्ये मराठी चित्रपट ‘बाबा’ ने सर्वश्रेष्ठ अभिनेता, सर्वश्रेष्ठ कथा आणि सर्वश्रेष्ठ फिल्म क्रिटिक्स अशा 3 मानाच्या पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली.

या विजयावर आनंद व्यक्त करताना मान्यता दत्त म्हणाल्या की, “हा चित्रपट माझ्या मनाच्या खूप जवळ आहे कारण, हा आमचा म्हणजे संजय दत्त प्रोडक्शन्सचा मराठीतला पहिलाच प्रयत्न आहे,मी आभारी आहे आणि आम्हाला मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि कौतुकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. सर्वात मोठा सम्मान आमच्या टीमला जातो ज्यांनी या कहाणीला पडद्यावर जीवंत करण्यासाठी प्रचंड मेहनत केली आहे.”त्या पुढे म्हणाल्या, “हे क्षण आम्हाला उत्तम काम करण्यासाठी आणि उत्तम कामासोबत दर्शकांचे मनोरंजन करण्यासाठी सदैव प्रोत्साहित करतील.”

वाचा :-राणा दग्गुबाती यांच्या ‘हाथी मेरे साथी’ चा ट्रेलर प्रदर्शित

चित्रपट ‘बाबा’ ने केवळ मान्यतालाच नव्हे, तर संपूर्ण भारतालाच अभिमान वाटला होता जेव्हा ‘गोल्डन ग्लोब’साठी नामांकित होणारा तो पहिला मराठी चित्रपट बनला होता आणि या प्रतिष्ठित समारोहात प्रदर्शित करण्यात आला होता.नागपुरकर राज आर गुप्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात दीपक डोबरियाल आणि नंदिता पाटकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या असून ‘संजय दत्त प्रोडक्शन’च्या बॅनर खाली बनलेल्या या चित्रपटाचे निर्माण मान्यता दत्त यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button