breaking-newsराष्ट्रिय

भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर इंदूरमध्ये आज अंत्यसंस्कार

इंदूर – अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज सकाळी 9 ते साडेबारा वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता इंदूरमधल्या मुक्तीधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील.

भय्यू महाराज यांनी काल (मंगळवार) इंदूरमधल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून जीवनातील तणावातून आपण आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button