breaking-newsआंतरराष्टीयकोरोनाव्हायरसताज्या घडामोडी

आफ्रिकी देशांमध्ये कोरोनाचा धोका वाढला, टॉप 10 बाधित देशांमध्ये द. आफ्रिका

दक्षिण आफ्रिका देशाचा समावेश कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या १० देशांमध्ये झाला आहे. आतापर्यंत येथे २,७६,२४२ रुग्ण आढळले आहेत, तर ४,०७९ मृत्यू झाले आहेत. यामुळे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी देशात १५ ऑगस्टपर्यंत आणीबाणी वाढवली आहे. यानुसार दररोज रात्री ९ ते पहाटे ४ या वेळेत कर्फ्यू असेल. दारू विक्री व वितरणावरही पुन्हा बंदी आहे. कौटुंबिक भेटी आणि सामाजिक भेटीदेखील प्रतिबंधित असतील. राष्ट्राध्यक्ष म्हणाले, दररोज सरासरी १२ हजार नवीन रुग्ण नोंदवले जात आहेत. बरेच नागरिक मास्क लावणे आणि अंतर राखणे यासारख्या खबरदारीच्या नियमांचे पालन करत नाहीत.

दुसरीकडे ब्रिटनमध्ये अनलॉकचा नवीन टप्पा सुरू झाला आहे. यानंतर सलूनसह इतर व्यवसाय येथे सुरू झाले. यूकेचे व्यापार मंत्री आलोक शर्मा म्हणाले, आम्हाला शक्य तितके व्यवसाय पुन्हा सुरू करायचे आहेत. परंतु असे करणे लोकांसाठी सुरक्षित असेल याबाबत आम्हाला आत्मविश्वास हवा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button