breaking-newsमहाराष्ट्र

चंद्रपूर : बिबट्याचा वन अधिकाऱ्यावर हल्ला

चंद्रपूर : लोहारा जिल्ह्यात वन अधिकाऱ्यावर बिबट्याने हल्ला चढवल्याने उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. एका वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी झाला होता. त्याला शोधण्यासाठी वनविभागानं मोहिम सुरु केली होती. आज सकाळी बांबूच्या एका झुडुपात बिबट्या विव्हळत होता. त्याला जाळीत पकडण्याचे प्रयत्न झाले. मात्र काही वेळाने त्याला बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन मारण्याचा निर्णय घेण्यात आला.

ही कारवाई केली जात असताना बिबट्याने अचानक आक्रमण केले. वनविभागाच्या अधिकाऱ्यानं हातातील फायबर गार्ड आणि काठीच्या मदतीने 5 मिनिटं प्रतिकार केला. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी इंजेक्शन मारुन बिबट्याला जेरबंद केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button