breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमनोरंजनमहाराष्ट्र

ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर यांचं आज सकाळी निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

ना. धों. महानोर हे मूळचे छत्रपती संभाजीनगरमधील. कन्नड तालुक्यातील पळसखेडा गावात १६ सप्टेंबर १९४२ रोजी त्यांचा जन्म झाला. पळसखेडा, पिंपळगाव, शेंदुर्णी या ठिकाणी त्यांनी शालेय शिक्षण घेतलं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुढे ते जळगावाला गेले. नंतर त्यांनी शालेय शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला. अन् पुन्हा गावाला आले.

हेही वाचा – हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईची मुळशी तालुक्यात दहशत, देसाईसह सहा जणांना अटक

अजिंठा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता, हे कविता संग्रह म्हणजे. ना. धों. महानोर यांच्या कवी मनातील भावभावनांचं तरलं चित्रण.

ना. धों. महानोर यांनी मराठी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली आहेत. १९९५ साली त्यांनी अबोली या मराठी चित्रपटासाठी लिहिलेली गाणी विशेष लोकप्रिय ठरली. त्याचबरोबर एक होता विदूषक (१९९), जैत रे जैत (१९७७), दोघी (१९९५), मुक्ता (१९९४), सर्जा (१९८७), उरूस (२००८), मालक (२०१५), अजिंठा (२०११) आणि यशवंतराव चव्हाण (२०१२) अशा काही चित्रपटांमधील गाण्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button