TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

येत्या २१ नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवरील १५ डब्बा लोकलच्या २६ फेऱ्या वाढणार

मुंबई : पश्चिम रेल्वे उपनगरीय प्रवास आणखी सुकर होणार आहे. बारा डबा लोकलला तीन डबे जोडून पंधरा डबा लोकलच्या येत्या २१ नोव्हेंबरपासून आणखी २६ फेऱ्या चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. चर्चगेट आणि विरारदरम्यान या लोकल फेऱ्या होतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली.

बारा डब्यांच्या लोकल पंधरा डब्यात रूपांतरित केल्यामुळे प्रत्येक लोकलची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार आहे. २६ लोकल फेऱ्यांपैकी १० फेऱ्या जलद मार्गावर चालवण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. या निर्णयाने पंधरा डब्याच्या लोकलच्या फेऱ्यांची एकूण संख्या १०६ वरून १३२ होणार आहे. मात्र यामुळे दररोज धावणाऱ्या एकूण फेऱ्यांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर पहिली १२ डबा लोकल १९८६ साली धावली आणि त्यानंतर २००६ मध्ये पहिली पंधरा डबा लोकल प्रवाशांच्या सेवेत आली. पश्चिम रेल्वेने अंधेरी – विरारदरम्यान धीम्या मार्गांवर पंधरा डबा लोकल चालवण्यासाठी फलाटांची लांबी वाढविली. त्यानंतर २८ जून २०२१ला या मार्गावर पंधरा डबा लोकलच्या २५ फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत आल्या. या नवीन प्रकल्पामुळे पंधरा डबा लोकलच्या फेऱ्या वाढवण्यास पश्चिम रेल्वेला बराच फायदा होत आहे. सध्या पंधरा डब्याच्या नऊ लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button