breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यंदाच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे

नवी दिल्ली – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण दिले होते.

पंतप्रधान मोदी यांनी 27 नोव्हेंबरला फोनवर झालेल्या संभाषणादरम्यान जॉन्सन यांना हे आमंत्रण दिले होते. जॉन्सन यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. राब म्हणाले, की “आमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारले आहे.”

वाचा :-नेव्हीचे वरिष्ठ सबमरीनर व्हाइस अडमिरल श्रीकांत यांचे कोविड-19 ने निधन

यानंतर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले की, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारल्यामुळे भारत आणि ब्रिटन यांच्या संबंधांमधील एका नव्या युगाचं प्रतीक असेल.

ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब भारत दौर्‍यावर आहेत. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची आज भेट घेतल्यानंतर ते म्हणाले की आम्हाला भारताशी आर्थिक संबंध बळकट करायचे आहेत. ते म्हणाले की दहशतवाद आणि कट्टरतावादामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांवर त्यांनी चर्चा केली, ज्या समान चिंता आहेत.

तब्बल 27 वर्षानंतर ब्रिटीश पंतप्रधान पुढच्या महिन्यात भारताच्या 70व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यापूर्वी जॉन मेजर हे 1993 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button