breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ब्राँझ पदक विजेते हरिश्चंद्र थोरात यांचा महापालिकेतर्फे सत्कार

पिंपरी – मलेशिया येथे झालेल्या एशिया पॅसिफिक मास्टर गेम स्पर्धेत दहा हजार मिटर धावण्याच्या स्पर्धेत ब्राँझ पदक पटकावून पिंपरी-चिंचवड शहराचा नावलौकीक वाढविणा-या हरिश्चंद्र थोरात यांचा सत्कार स्थायी समितीच्या वतीने सभापती ममता गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन करण्यात आला.

 

स्थायी समिती सभागृहात झालेल्या या सत्कार समारंभाच्या वेळी स्थायी समिती सदस्य विलास मडीगेरी, अमित गावडे, राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, विकास डोळस, करुणा चिंचवडे, नम्रता लोंढे, गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर, सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, साधना मळेकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, दिलीप गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

दिनांक ७ ते १५ सप्टेंबर २०१८ दरम्यान मलेशियामध्ये या स्पर्धा झाल्या. थेरगाव येथील रहिवाशी असणारे हरिश्चंद्र थोरात यांनी त्यात सहभाग घेतला. त्यामध्ये त्यांनी ब्राँझ पदक पटकावले, त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button