breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यात 6 हजार 417 नवे रुग्ण, रिकव्हरी रेटही सुधारला

मुंबई – गेल्या 24 तासात १० हजार ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार १०७ कोरोना रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८८.७८ टक्के इतका झाला आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात ६ हजार ४१७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात मागील २४ तासांमध्ये १३७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा सध्या २.६३ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

राज्यात १३७ कोरोना मृतांची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८५ लाख ४८ हजार ३६ रुग्ण नमुन्यांपैकी १६ लाख ३८ हजार ९६१ इतके नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख ३ हजार ५१० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर १४ हजार १७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

राज्यात १ लाख ४० हजार १९४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात मागील २४ तासात ६ हजार ४१७ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १६ लाख ३८ हजार ९६१ इतकी झाली आहे.

मुंबईत १२५७ नवे नवे करोना रुग्ण

मुंबईत आज १२५७ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. मागील २४ तासात ८९८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर मागील २४ तासांमध्ये मुंबईत करोनामुळे ५० मृत्यू झाले आहेत. सध्याच्या घडीला मुंबईत १९ हजार ५५४ अॅक्टिव्ह केसेस आहेत अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button