breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

बेस्ट बसच्या गर्दीत तरुणीसोबत अश्लील वर्तन, नराधम अटकेत

मुंबई- मुंबईत बेस्ट बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन एका 22 वर्षांच्या तरुणीसोबत अश्लील वर्तन आणि छेडछाड करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र पाटील असं या नराधमाचं नाव असून तो मुंबईतील चेंबूर भागात असलेल्या लाल डोंगर भागात राहतो. या तरुणाची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ही कारवाई केली.

22 वर्षांची तरुणी बेस्ट बसमध्ये गर्दी असल्याने उभी होती. तिच्या मागे उभा असलेला राजेंद्र पाटील हा तिला धक्का मारत होता. सुरुवातीला या तरुणीने याकडे लक्ष दिले नाही कारण तिला वाटले की बसमध्ये खूप गर्दी आहे म्हणून धक्का लागला असावा. तसंच तिच्या मागे उभ्या असलेला राजेंद्र पाटील नेमकं काय करतो आहे हे तिला कळलं नाही. मात्र बसमधले प्रवासी जसे पुढे सरकू लागले तशी गर्दी कमी झाली. तरीही राजेंद्र पाटील तिच्या मागेच उभा होता. तसंच तो गरजेपेक्षा जास्त जवळ आला आहे हेदेखील या तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर राजेंद्र पाटीलने जेव्हा तरुणीला धक्का मारला तेव्हा तिला जाणवले की तो तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करु पाहतो आहे. ज्यानंतर तिने मागे वळून पाहिले तेव्हा तिला धक्काच बसला कारण तिने मागे वळून पाहताच राजेंद्र पाटीलने पँटची चेन उघडली. या प्रकारामुळे गोंधळून गेलेल्या तरुणीने राजेंद्र पाटीलच्या कानाशीलात लगावली आणि इतर प्रवाशांनाही हा माणूस काय करतो आहे ते बघा असे सांगितले. पोलिसांनी ही माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button