breaking-newsपुणेमहाराष्ट्र

बेमुदत ‘चक्का’जाम आजपासून

पुणे – डिझेलचे दर कमी करावेत, राष्ट्रीय स्तरावर समान मूल्य निर्धारित करावे, याशिवाय विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट संघटनेने आजपासून बेमुदत देशव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. यात पुण्यातील महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक संघटनेने पाठींबा दिल्याने स्कूल बस, स्टाफ ट्रान्सपोर्ट बस, पॅकेज टूर करणाऱ्या बसेस बंद राहणार आहेत.

यासंदर्भातील निवेदन महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. माल वाहतूकदारांच्या काही मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत केंद्र सरकारलाही वारंवार निवेदन देण्यात आले होते. पण, त्यांनी दखल घेतली नाही. तर, राज्य शासनाकडील मागण्यांबाबतही दुर्लक्ष होत आहे, असे संघटनेने म्हटले आहे.

पुण्यातील सर्व वाहतूकदारांनी संपला पाठींबा दिला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात सुमारे तीन लाख माल वाहतूक, कंपनीच्या १३ हजार बसेस आणि शालेय वाहतूक करणाऱ्या साडेसात हजार खासगी बसेस आहेत. फक्त रिक्षा वाहतूक वगळता सर्व वाहतूक व्यवस्था या संपात सहभागी होणार आहेत.

-बाबा शिंदे, अध्यक्ष वाहनचालक-मालक संघटना, महाराष्ट्र

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button