breaking-newsपुणेमहाराष्ट्र

त्या तरुणीच्या मृत्यूचे गुढ पंधरा दिवसांनी उकलणार

पुणे- बुधवारी रात्री पुणे कॅन्टोमेन्ट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालयात 18 वर्षीय तरुणीच्या मृत्युप्रकरणी अद्यापही संभ्रम कायम असून पुढील पंधरा दिवस हा संभ्रम कायम रहाणार असल्याचे दिसते आहे. तरुणीच्या मृतदेहाचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून त्यामध्येही मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. तिचा व्हिसेरा पॅथॉलॉजी तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला असून त्याबाबत दहा ते पंधरा दिवसांनी त्याचा अहवाल येणार आहे.
आसीया ताहीर सय्यद या कासेवाडी येथे रहाणाऱ्या तरुणीचा बुधवारी मृत्यू झाला. नातेवाईकांच्या मते आसीयाला डेंग्यू झाला होता व अवयवांतून रक्तस्त्राव होत होता. तसेच पटेल रुग्णालयातील डॉक्‍टरांच्या निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. तर आसियाला एक श्‍वसनविकार झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे तिच्यावर उपचार करणारे डॉक्‍टरांकडून सांगण्यात येत आहे. डॉक्‍टरांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत मुलीच्या वडिलांनी लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान तरुणीचे शव ससूनमध्ये शवविच्छेदनासाठी गेले असता याबाबत ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. बी. पुनपाळे यांनी सांगितले की, त्यांनी या तरूणीचा व्हिसेरा तपासणीसाठी राखून ठेवला आहे. त्याचा अहवाल दहा ते पंधरा दिवसांनी येणार असून त्यानंतर मृत्यूचे कारण समजेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button