breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बेदरकार डंपरचालकांवर कारवाईचा बडगा

  • जड वाहनांमुळे शहरात ३३ प्राणांतिक अपघात

पुणे:- शहरात गेल्या नऊ महिन्यांत ट्रक तसेच डंपर अशा जड वाहनांच्या चालकांमुळे ३३ गंभीर अपघात झाले असून भरधाव डंपर चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

शहरातील मध्यभागाच्या तुलनेत उपनगरात जड वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. या भागातून शहराबाहेरून येणारी ट्रक तसेच डंपर अशी जड वाहने जातात. भरधाव डंपरचालकांच्या बेदरकारपणामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडले आहेत. विमाननगर भाग तसेच पुणे-नगर रस्त्यावर जड वाहनांना सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेत वाहनांना बंदी घालण्यात आली असून पोलिसांनी प्रवेश बंदीचे आदेश दिल्यानंतर दिवसा या भागातून वाहतूक करणाऱ्या डंपरचालकांवर विमानतळ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी आणि त्यांच्या पथकाने नुकतीच कारवाई केली. प्रवेशबंदीची वेळ झुगारून या भागातून जाणाऱ्या आठ डंपरचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ५ लाख ७० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button