breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

“बेचव होणे आणि वास घेण्याची क्षमता कमी होणे”,कोरोनाची नवी लक्षणे

भारतात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चाचली आहे. अनेकदा या विषाणूचे निदानही लवकर होत नाहीये. लोकांना सर्दी, खोकला, ताप आल्यास तो वायरल आहे असे समजून ते त्याकडे दुर्लक्ष करतात. ज्याचा परिणाम लोकांना कोरोनाची लागण होत आहे. सर्दी, खोकला, कफ, स्नायू दुखी, घसा खवखवणे, नाक गळणे, अतिसार ही कोरोनाची प्राथमिक लक्षणे असल्याचं वैद्यकिय तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र आता या लक्षणांमध्ये बेचव होणे आणि वास घेण्याची क्षमता कमी होणे या दोन लक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली असून त्यानुसार लोकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तोंडाची चव जाणे आणि वास घेण्यास अडथळा निर्माण होणे हे देखील कोरोनाची लक्षणे असल्याचं वैद्यकिय तपासात आढळून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार एका दिवसात कोरोनाचे 11,458 नवे रुग्ण आढळून आले आहेत, यानुसार देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 लाख 8 हजार 993 वर पोहचली आहे. यापैकी 1 लाख 45 हजार 779 ऍक्टिव्ह प्रकरणे असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याशिवाय, 1 लाख 54 हजार 330 जणांनी कोरोनावर मात केली आहे तसेच 8884 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची नविन लक्षणही आता दिसू लागल्याने नक्कीच चिंतेच वातावरण लोकांमध्ये निर्माण होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button