breaking-newsआंतरराष्टीय

पाकच्या कुरापती सुरूच, राजौरीत शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू- काश्मीर:- जम्मू- काश्मीरमध्ये सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून राजौरीत पाकिस्तानी सैन्याने सोमवारी पहाटे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. सकाळी सव्वा सात वाजेपर्यंत हा गोळीबार सुरूच होता. भारतीय सैन्यानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. सोमवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने राजौरी सेक्टर येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यात उखळी तोफांचा मारा देखील करण्यात आला. यानंतर भारतीय सैन्याने देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.

https://twitter.com/ANI/status/1107483890812420101

रविवारी देखील पाकिस्तानी सैन्याने सुंदरबनी सेक्टर येथे गोळीबार केला होता. सुंदरबनीतील केरी भागातील भारतीय चौक्यांवर पाकिस्तानने गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. संध्याकाळ पासून हा गोळीबार सुरु होता, असे समजते. या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, पाकिस्तानी रेंजर्सने ९ मार्च रोजी केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात एक अधिकारी जखमी झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button