breaking-newsताज्या घडामोडी

बेगडी हिंदुत्व पांघरलेल्या शिवसेनेला औरंगाबादेतून हद्दपार करा: चंद्रकांत पाटील

औरंगाबाद | महाईन्यूज

महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या ३० वर्षांतील नाकर्तेपणाचा पाढा वाचत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे. तर बेगडी हिंदुत्व पांघरलेल्या शिवसेनेला औरंगाबादेतून हद्दपार करण्याचे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भाजपतर्फे मेनॉर हॉटेलच्या लॉनयर शनिवारी सायंकाळी पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते.

शिवसेनेवर निशाणा साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेची मागील ३० वर्षांपासून महापालिकेत सत्ता आहे. या काळात शिवसनेने केलेले एक काम दाखवा. शहरात कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत. जनतेला जे हवे ते शिवसेनेने उभारले नाही. त्यामुळे आम्हाला महापालिकेतील एकहाती सत्ता द्या, आम्ही मोफत शौचालय व्यवस्था, वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र, महिलांसाठी मोफत बससेवा, हॉस्पिटल सेवा देऊ, अशा घोषणा पाटील यांनी करीत निवडणुकीचे रणशिंग फुंकले . शिवसेनेने जनतेशी गद्दारी केली आहे. आता घटनेत नसताना मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेत आहेत. सावरकरांना बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. अशी ही शिवसेना शहरातील जनतेला सुरक्षा देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांना हद्दपार करा, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button