breaking-newsराष्ट्रिय

बॅंक ऑफ इंडियाच्या दोन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक

नवी दिल्ली – सीबीआयने शुक्रवारी बॅंक ऑफ इंडियाच्या दोन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक केली. वडोदरास्थित डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्‍चर लि.(डीपीआयएल) या कंपनीने केलेल्या 2 हजार 654 कोटी रूपयांच्या कर्ज घोटाळ्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. व्ही.व्ही. अग्निहोत्री आणि पी.के.श्रीवास्तव अशी अटक झालेल्या निवृत्त अधिकाऱ्यांची नावे आहेत.

कर्ज मंजूर करताना डीपीआयएलवर अयोग्य मेहेरनजर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्या कंपनीचे प्रवर्तक सुरेश भटनागर आणि अमित व सुमित या त्यांच्या मुलांना एप्रिलमध्येच अटक करण्यात आली आहे. इलेक्‍ट्रिक केबल्स आणि सामग्रीचे उत्पादन करणाऱ्या डीपीआयएलने फसवणुकीच्या मार्गाने 11 बॅंकांकडून 2008 पासूून विविध रकमेचे कर्ज घेतले. ते कर्ज बुडित ठरल्याचे 2016-17 या आर्थिक वर्षात जाहीर करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button