breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पावसामुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द

पुणे – राज्यात परतीच्या पावसाने कहर केला आहे. मागील दोन तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून पुण्यात तर पावसाचं धुमशान सुरू आहे. पुण्याला बुधवारी रात्री मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपले. त्यामुळे घराघरांत पाणी शिरले आहे. ही परिस्थिती पाहता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आज होणाऱ्या सर्व नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून परीक्षांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. मात्र बुधवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने शहराच्या मध्यभागी म्हणजेच पेठांचा सर्व भाग पाण्याने वेढला होता. तब्बल ५०हून अधिक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. हे पाणी काढण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ सुरू होती. या पावसात अनेक नागरिकांच्या गाड्यादेखील वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आणखी दोन दिवस असाच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button