breaking-newsमनोरंजन

‘बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ गली बॉय ही झळकणार

ऑस्कर पुरस्कारासाठी अधिकृत एन्ट्री मिळालेला गली बॉय हा चित्रपट आता आणखी एक आंतरराष्ट्रीय महोत्सव गाजवणार आहे. ‘बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ही गली बॉय प्रदर्शित करण्यात येणार आहे. झोया अख्तरच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट आंतरराष्ट्रीय वर्तुळात देखील सर्वांच्या पसंतीस उतरला आहे.
मागच्या वर्षी दक्षिण कोरियामधील बुकियॉन इंटरनेशनल फैंटास्टिक फिल्म फेस्टिवल (बीआईएफएएन) मध्ये त्याला सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपट म्हणून एनईटीपीएसी अवार्ड जिंकल्यानंतर, चित्रपटाला लोकप्रिय सिनेमा म्हणून लोकाग्रहास्तव ‘रिक्वेस्ट सिनेमा स्क्रीनिंग श्रेणी’मध्ये प्रतिष्ठित अशा ‘बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ आमंत्रित करण्यात आले आहे.

‘गली बॉय’ला 2019 मध्ये झालेल्या 92व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे अधिकृत एंट्री पाठवण्यात आली होती. चित्रपटाने दिग्दर्शन, कलाकार आणि इतर अन्य गोष्टींसाठी अनेक पुरस्कार मिळवले आहेत आणि सर्वाधिक फिल्मफेयर अवार्ड्स जिंकण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button