breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बुलढाणा जुल्ह्यातील घृणास्पद प्रकाराच्या निषेधार्त पिंपरीत जोडेमारो आंदोलन

पिंपरी – पीक कर्ज मंजूर करण्यासाठी शेतकरी महिलेला चक्क शरिर सुखाची मागणी करण्याचा प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर दाताळ येथे घडल्याने देशभरात खळबळ उडाली. याच्या निषेधार्त पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बँक व्यवस्थापकाला जोडेमारो आंदोलन करण्यात आले.

यावेळी कामगार आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष शबाब शाह, युवाध्यक्ष अजिंक्य बारणे, गौतम सुराजकर, नितेश गाडगे, संतोष पवार, किरण पाटील, तुषार गावडे, साकेत धावारे, मोतेश भालशंकर, रसूल इनामदार, योगेश राऊत, अनिकेत फुटाणे, आशिष गोलांडे आदी उपस्थित होते.

पक्षाचे शहराध्यक्ष नीरज कडू म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यातील दाताळ येथील एका राष्ट्रीयकृत बँकेत वरिष्ठ पदावर काम करणा-या एका अधिका-याने पीक कर्ज काढण्यासाठी आलेल्या एका शेतकरी महिलेकडे कर्ज मंजूर करण्यासाठी शरीरसुखाची मागणी केली. हे कृत्य अतिशय घृणास्पद असून याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय दंड संहिता कायदा कलम 353 प्रमाणे शासकीय लोकसेवकाच्या कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा होऊ शकतो.

त्यामुळे काही अधिकारी याचा गैरफायदा घेत आहेत. याचा वापर करून काही शासकीय अधिकारी सर्वसामान्य लोकांची मुस्कटदाबी करतात. असे प्रकार वाढत असून याबाबत शासनाच्या वतीने कोणतीही पावले उचलली जात नाहीत. अशा अधिका-यांना शासनाने कायदयाचे संरक्षण देणे योग्य आहे का? असा प्रश्न कडून यांनी यावेळी उपस्थित केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button