breaking-newsमनोरंजन

कतरिना आणि जॅकलीनमधील शीतयुद्ध सलमानला पडते भारी

सलमान खानच्या दोन फेव्हरेट ऍकट्रेस कतरिना कैफ आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्यामध्ये सध्या शीतयुद्ध सुरु आहे. या दोघी काही दिवसांपूर्वी सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या लग्नामध्ये सलमान खानबरोबर एकत्र आलेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हसून खेळत भरपूर टाईमपासही केला होता. मात्र आता या दोघींमधून विस्तवही जात नाही, अशी स्थिती आहे. त्याला निमित्त झाले आहे ते सलमान खानच्या “दबंग टूर’चे, या कॉन्सर्टमध्ये सलमान बरोबर जॅकलीन फर्नांडिस, डेसी शाह, सोनाक्षी सिन्हा, मनिष पॉल आणि कतरिना कैफ असणार आहेत.

कतरिना आणि जॅकलीन या टूरमध्ये एकमेकींना टाळण्याचा प्रयत्न करायला लागल्या आहेत. या कॉन्सर्ट टूरमध्ये एकमेकींच्या बरोबर कोणताही परफॉर्मन्स करणार नाही, असे दोघींनीही सलमानला सांगून टाकले आहे. या दोघींना हॉटेलमध्ये वेगवेगळ्या मजल्यावरच्या खोल्या दिल्या गेल्या आहेत.

खरे तर या दोघींना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये रहायचे आहे. या दोघींमध्ये हे शीतयुद्ध नेमके का सुरू झाले, हे माहित नाही. मात्र इतर कारणाबरोबर एक कारण सलमान खान हेच असावे. आता या दोन बायकांमध्ये बिचाऱ्या सलमानचा मात्र सॅन्डविच होतो आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button