breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ग्राहक हक्क संघटनेच्या वतीने पार्किंग पॉलिसी धोरणाचा निषेध

पिंपरी – वाहनतळाची जागा ताब्यात नसताना सत्ताधारी भाजपने पार्किंग पॉलिसी आणून त्याला महासभेची नुकतीच मंजुरी देखील घेतली आहे. या धोरणाचा ग्राहक हक्क संघर्ष समिती व पिंपरी-चिंचवड ग्राहक सेवा संस्थेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. पेट्रोलच्या चढ्या भावाने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने पे अॅण्ड पार्क धोरण निश्चित केले आहे.

या धोरणानुसार सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत प्रत्येक वाहनासाठी नागरिकांना 25 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच नागरिकांना वाहने पार्क करण्यासाठी वर्षाकाठी तब्बल 9 हजार 125 रुपये मोजावे लागणार आहेत. ही रक्कम शहरातील घरपट्टीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे एवढे पैसे भरणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा विचार करत हे धोरण रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button