breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

बीड-परळीतून प्रीतम आणि पंकजा मुंडेंना कोणाचा बापही हरवू शकत नाही – महादेव जानकर

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  बीड आणि परळी येथून प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे या मोठ्या फरकाने निवडून येणार, कोणाचा बापही त्यांना हरवू शकत नाही, अशी टीका नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर राज्यमंत्री महादेव जानकर यांनी केली. 

ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या ६९ व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या आठवणीतील मुंडे साहेब या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज्यमंत्री पंकजा मुंडे,आजी माजी आमदार,कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यमंत्री महादेव जानकर म्हणाले की, जो कोणी व्हाट्स अॅपवर  म्हणतोय की, मीच निवडून येणार त्याला चॅलेंज देऊन सांगतो की बीड आणि परळी मधून प्रीतम आणि पंकजा मुंडे मोठ्या फरकाने निवडून येतील. कोणाचा बापही त्यांना हरवू शकत नाही, असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर जानकर यांनी टीका केली. यावेळी जानकार यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

‘भगवी वस्त्र घातले तर महाराज बनेल मला कुठला स्वार्थ नाही, त्यामुळे पंकजा ताईंना सोडण्याचं कारणच नाही’ असंही जानकर म्हणाले. तसंच, मुंडे यांच्यामुळे राजकीय क्षेत्रातील उंची वाढली. सर्वकाही रेडीमेड मिळाले असं देखील ते म्हणाले. बारामती निवडणूक हरलो आणि नॅशनल हिरो झालो, ताई तुमचा आशीर्वाद राहू द्या पुन्हा कुस्ती खेळायची आहे.असं म्हणत बारामतीमधून पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा जानकर यांनी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button