breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रिमियर कंपनी कामगाराबाबत चर्चेतून तोडगा काढावा – आमदार महेश लांडगे

कामगार आयुक्तांकडील बैठकीकडे कंपनी व्यवस्थापनाची पाठ

पिंपरी – पुणे- मुंबई रस्त्यावरील प्रिमियर कंपनीतील कामगार विविध मागण्यासाठी मागील 54 दिवसापासून आंदोलन करीत आहे. त्या आंदोलनाकडे कंपनी व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले होते. या आंदोलनातील कामगारांच्या मागण्याकडे आमदार महेश लांडगे यांनी लक्ष देवून त्यांनी कंपनी व्यवस्थापन व कामगारांनी कामगार आयुक्तासमोर बसवून बैठक घ्यावी, तसेच दोघांनी सकारात्मक चर्चा करुन योग्य तोडगा काढावा, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले. 

यावेळी कामगार आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत सहाय्यक कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, प्रिमियर कामगार संघटनेचे अध्यक्ष आशिष शिंदे ,सचिव नंदू जाधव,  प्रदीप पवार आदी उपस्थित होते.

यावेळी  प्रीमिअर कंपनी कामगारांबाबत मागील अनेक वर्षांपासून संकुचित वृत्तीने वागत असून सहा महिने झाले त्यांचा पगार केला नाही ,त्यामुळे कामगारांचे विमा हप्ते , शाळा फीस, घरभाडे थकले  आहे. कंपनीचे कामगार सध्या अडचणीत आहेत, कंपनी व्यवस्थापन त्यांना वेगवेगळ्या कारणांनी त्रास देत आहे , म्हणून कामगारांनी सुमारे ५४ दिवसापासून कंपनी गेटवर आंदोलन सुरु केले आहे, यास विविध संघटना पाठिंबा देत आहेत.

याबाबत कामगारांनी आंदोलनातून आपल्या रास्त मागण्या कंपनी व्यवस्थापनाकडे केल्या होत्या. त्याला कंपनीने दाद दिली नाही, तसेच कंपनीकडे चर्चेसाठी गेले तर धमकी दिली म्हणून कामगारांना  बेकायदेशीर बाहेर काढून काम बंद केले, कामगारांची आर्थिक कोंडी करण्याचे काम केले जात आहे, यावर कामगारांनी संताप व्यक्त केला असून आंदोलन यापुढेही सुरु ठेवून मागण्या लावून धरण्यात येणार आहेत, दरम्यान, या बैठकीला व्यवस्थापन हजर झाले नाही, आता सोमवारी होणाऱ्या बैठकीकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button