breaking-newsराष्ट्रिय

बिहार मधील विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकासह 18 जणांचा बलात्कार

छाप्रा – बिहार मधील सरण जिल्ह्यातील इयत्त्ता नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर तिच्या शाळेच्या मुख्याध्यपकासह दोन शिक्षक आणि 16 विद्यार्थ्यांनी अशा एकूण 19 जणांनी गेले सात महिने बलात्कार केल्याचे एक भीषण प्रकरण उघडकीला आले आहे. या प्रकरणी मुख्याध्यापक, एक शिक्षक आणि चार विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे.

त्यांच्यावर बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आपल्यावर गेल्या सात महिन्यांपासून हे अत्याचार सुरू होंते असे तिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. ही शाळा पारसगड गावात आहे. हे गाव छाप्रा पासून 35 किमी अंतरावर आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलिसांनी एक विशेष तपास पथक स्थापन केले आहे.

या मुलीवर शाळेतील काही विद्यार्थ्यांनी डिसेंबर 2017 मध्ये शाळेच्या स्वच्छतागृहात पहिल्यांदा बलात्कार केला. या मुलांनी तिच्यावरील अत्याचाराचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ जाहीर करण्याची धमकी देऊन त्यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला.मुलीने हा प्रकार मुख्याध्यापकांना सांगितल्यानंतर त्यांनी तिला हा प्रकार कोणालाही न सांगण्यासाठी तिचे मन वळवले. हा प्रकार उघड झाला तर शाळेची इभ्रत जाईल असे त्यांनी तिला सांगितले. त्या

नंतर या मुख्याध्यापकांनेच तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला आणि त्यांच्या बरोबरच्या दोन शिक्षकांनीही हेच कृत्य केले. गेले सात महिने हा प्रकार सुरू होता. या मुलीचे वडिल एका गुन्ह्यात गेले अनेक महिने तुरूंगात आहेत. त्यामुळे तिची या प्रकरणी पोलिस तक्रार करण्याची हिमंत झाली नाही. तिचे वडिल दोन दिवसांपुर्वी तुरूंगातून सुटून आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तपासाची सारी सूत्रे हलली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button