breaking-newsपिंपरी / चिंचवड

गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्यांबाबत रविवारी चिखलीत परिसंवाद

  • आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची राहणार उपस्थिती

पिंपरी, (महाईन्यूज) – चिखली-मोशी हौंसिग सोसायटी फेडरशेनच्या पुढाकाराने परिसरातील गृहनिर्माण सोसाट्यांच्या समस्यांबाबत येत्या रविवारी (दि. 21) परिसंवाद आयोजित केला आहे. आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित राहणार आहेत. परिसंवादातून जागेवरच समस्या सोडविल्या जाणार आहेत.

चिखली मोशी हौंसिग सोसायटी फेडरशेनतर्फे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि. 21) देहू-मोशी रोडवरील सिटी प्राईड स्कूल चिखली येथे या परिसंवादाचे आयोजन केले आहे. भोसरी, चिखली, मोशी, च-होली, दिघी परिसरातील गृहनिर्माण सोसाट्यांमधील समस्या, प्रलंबित प्रश्न, महापालिकेतर्फे केल्या जाणा-या विकास कामांबाबत या परिसंवादात चर्चा केली जाणार आहे.

गृहनिर्माण सोसायटीतील समस्या, प्रश्न प्रलंबित कामांची माहिती सोसायटीतील पदाधिका-यांनी निवेदनाद्वारे द्यावी. परिसंवादात सोसायटीतील एकाच पदाधिकाराने सहभागी व्हावे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी अनिकेत गायकवाड यांच्याशी 7720043861 आणि संजीवन सांगळे यांच्याशी 8975282377 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button