breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बिहारमध्ये अटीतटीची लढत; एनडीए आघाडीवर

पाटणा – कोरोनाच्या संकटात पार पडत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून यात महाआघाडीची घोडदौड पाहायला मिळत आहे. तर भाजपा आणि आरजेडीमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दरम्यान, बिहारमध्ये तीन टप्प्यांत निवडणुका पार पडल्या. यात 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबरला 243 जागांसाठी मतदान झाले.

एनडीए स्पष्ट बहुमताच्या पुढे
निवडणूक आयोगाकडून सध्याचे कल जाहीर करण्यात आले आहेत. २४३ मतदारसंघातील चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. सध्या एनडीए १२७ जागांवर आघाडीवर आहे. यात भाजपा ७३, जदयू ४७, तर व्हीआयपी पक्षाचे ७ उमेदवार आघाडीवर आहेत. तर महागठबंधन १०० ठिकाणी आघाडीवर आहे. यात राजद ६१, काँग्रेस २०, डावे १९ जागांवर आघाडीवर आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button