breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

बिळाशी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या कामाचा शुभारंभ; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची उपस्थिती

शिराळा । महाईन्यूज । प्रतिनिधी

बिळाशी (ता. शिराळा) येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रचा पायाभरणी शुभारंभ झाला.

यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे अध्यक्षस्थानी होते. खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंगराव नाईक, युवा नेते प्रतीक पाटील यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी आमदार नाईक यांच्या प्रयत्नातून शिराळा-शाहुवाडी तालुक्याला जोडणारा बिळाशी ते भेडसगाव दरम्यानचा वारणा नदीवरील ९ कोटी रुपये खर्चाचा मोठा पूल लोकार्पन झाला आहे. पश्चिम व उत्तर भागाला जोडणारा बिळाशी दुरंदेवाडी, कुसाईवाडी, मादळगाव ते वाकुर्डे बुद्रूक हा २.५० कोटी रुपये खर्चाचा अत्यंत महत्वाचा रस्ता पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे. आता २.२५ कोटी खर्चून प्रा. आ. केंद्राची इमारत उभी राहात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button