breaking-newsपिंपरी / चिंचवड

मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांचा ”राज्यस्तरीय समाज गौरव” पुरस्काराने सन्मान

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी 

राज्यस्तरीय कला गौरव महोत्सव २०१९ यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार यंदा पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांना प्रदान करण्यात आला.

पन्हाळा, कोल्हापूर येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वास्तुविशारद आनंद पिंपळकर, पन्हाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल, महाराष्ट्र क्रांतीसेनेचे सचिव प्रणय सावंत, अभिनेते सुरेश डाळे, राज्य कृषी पणन महामंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, माध्यमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या उपाध्यक्षा मेघा डोळस, दिग्दर्शक महेश्वर मेटांबे, सतीश वाघ आदी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना अरुण पवार म्हणाले की, आपण समाजात वावरताना समाजाची बांधिलकी जपली जावी. आपण समाजाचे काही देणे लागतो, या उद्देशाने काम करीत राहिले पाहिजे. त्याची पावती अशा पुरस्कारातून मिळत राहते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी यांनी केले. तर, आभार विलास कोळेकर यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button