breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी थोडक्यात बचावला…

महाईन्यूज | जुन्नर

नंदनवाडी परिसरात वीजपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शांताराम भीमाजी गाडेकर (वय 65) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढवला व त्यात ते जखमी झालेले आहेत. दैव बलवत्तर म्हणून ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत.गाडेकर यांच्या घरापासून अवघ्या पन्नास फुटाच्या अंतरावर ओढ्याजवळ त्यांची विहीर आहे. ते सोमवारी (ता. 9) सकाळी साडेसहा वाजता विहिरीवरील वीजपंप सुरू करण्यासाठी गेले होते. त्या वेळी अचानक समोरासमोर बिबट्याचा आणि त्यांचासमोर आला व बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवत त्यांच्या हाताला चावा घेतला; तर डोक्‍याला पायाच्या नखांनी जखमा केल्या आहेत. गाडेकर यांनी धाडस दाखवत जोरजोरात आरडाओरडा केल्यामुळे त्यांची मुले धावत घटनास्थळी आली व आरडाओरडा झाल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. सुदैवाने या प्राणघातक हल्ल्यातून गाडेकर बचावले.

ग्रामस्थांच्या मागणीनुसार बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळावर वनविभागाने तातडीने पिंजरा लावला आहे. शेतकऱ्यांनी पहाटे व रात्री शेतात जाताना समूहाने जावे, रात्रीच्या वेळी बॅटरीचा वापर करावा, गाणी वाजवावी, या स्वरूपाची काळजी घेण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी केले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button