breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन-२०२२ : महापालिका निवडणूक प्रारुप आराखडा १ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार!

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले असून प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा 1 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यावर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती सूचना मागविल्या जाणार आहेत. दरम्यान, आपला प्रभाग कसा असेल, कोणाचे निशब उजाळणार, कोणाचे फिरणार याचा बऱ्यापैकी अंदाज या आराखड्यातून येणार असल्याने सर्वांनाच त्याची उत्कंठा लागून राहिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक तीनसदस्यीय पद्धतीने होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि आरक्षण सोडत एकाचदिवशी जाहीर केली जाते. परंतु, ओबीसी  समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.  त्यामुळे महापालिका निवडणुकीची प्रक्रिया थंडावली होती. ओबीसींच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अगोदर जाहीर करण्याचा निर्णय घेतला असून आरक्षण सोडत नंतर काढली जाणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी प्रारूप आराखडा प्रसिध्द होणार आहे.

निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना  शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे व त्यास प्रसिद्धी देणे 1 फेब्रुवारी 2022, प्रारुप अधिसूचनेवर हरकती व सूचना मागण्याचा कालावधी 1 ते 14 फेब्रुवारी 2022 , प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करणे 16 फेब्रुवारी , राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचना यावर सुनावणी देण्याचा अंतिम दिनांक 26 फेब्रुवारी, सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठवण्याचा दिनांक 2 मार्च 2022 असा आराखडा प्रसिद्धीचा कार्यक्रम राहणार आहे. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा कार्यक्रम महापालिकेला पाठविला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button