breaking-newsपिंपरी / चिंचवड

शहरात मातृ वंदना योजनेत 16 हजार गरोदर मातांना लाभ

पिंपरी महाईन्यूज प्रतिनिधी

केंद्र शासनाची मातृ वंदना योजना शहरामध्ये राबविण्यात येत आहे. एप्रिल 2018 ते 9 डिसेंबर 2019 या कालावधीत शहरातील 16 हजार 401 गरोदर व स्तनदा मातांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील जास्तीत जास्त गरोदर मातांना मातृ वंदना योजनेचा लाभा मिळावा यासाठी वैद्यकिय विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी 2 ते 8 डिसेंबर हा मातृ वंदना सप्ताह महापालिकेच्या वतीने राबविण्यात आला. या योजनेमध्ये गरोदर असलेल्या मातेला तीन हप्त्यामध्ये पाच हजार रुपये रक्कम सकस आहारासाठी दिली जाते. विवाहित महिलांना पहिल्या अपत्यावेळी ही योजना लागू आहे. लाभार्थी गरोदर महिलेने गरोदर असल्याची नोंद शंभर दिवसांच्या आतमध्ये केल्यास पहिला एक हजार रुपयांचा हप्ता मिळतो.

गरोदरपणाच्या सहा महिन्यांत एक प्रसुतिपूर्व तपासणी केली असता दुसरा दोन हजार रुपयांचा हप्ता देण्यात येतो. तर प्रसुती झाल्यानंतर बाळाच्या जन्माची नोंद व बीसीजी, ओपीव्ही डोस घेतल्यानंतर तिसरा दोन हजार रुपयांचा हप्ता येतो. अशा प्रकारे महिलेला सकस आहार घेण्यासाठी पाच हजार रुपये अनुदान दिले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरोदर महिलांनी महापालिकेचे रुग्णालय, दवाखाना, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button