breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

दापोडी दुर्घटना, ठेकेदार कंपनीसह सल्लागाराला महापालिका करणार ‘ब्लॅकलिस्ट’

अर्धवट कामामुळे ठेकेदाराला प्रतिदिन एक लाख रुपये दंड, 21 महिन्यात 40 टक्केच काम

पिंपरी |महाईन्यूज|विकास शिंदे

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अमृत योजनेतंर्गत दापोडी येथे मलनिःसारण पाईपलाईनसाठी खोदकाम करण्यात आले आहे. याठिकाणी झालेल्या दुर्घटनेत एका मजूरासह अग्नीशमन जवानाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाटील कन्स्ट्रक्शन व इन्फ्राक्ट्रक्चर लिमिटेडचे एम.बी. पाटील आणि युनिटी कन्स्ट्रक्शन सल्लागार महेश पाठक यांना नोटीस देवून सात दिवसात खुलासा मागविला आहे. तसेच या दोघांवर पालिकेकडून ‘ब्लॅकलिस्ट’ची कारवाई करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय नागरी सुधारणा अभियान अंतर्गत (अमृत) पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अमृत योजनेंतर्गत मलनिःसारण पाईपलाईनसाठी खोदकाम सुरु होते. संपुर्ण शहरात मलनिःसारणासाठी सुमारे 148 कोटी रुपये मंजुर झाले होते. त्या कामाचे आदेश 7 मार्च 2018 रोजी मे. पाटील कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे मालक एम.बी. पाटील यांना देण्यात आले. या कामाची 6 मार्च 2020 रोजी मुदत संपणार आहे. जुलैअखेर हे काम 20 टक्केच झाले होते. ह्या कामाचे चार महिने शिल्लक राहूनही एकूण 40 टक्केच काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे पालिकेकडून संबंधित ठेकेदाराला गेल्या सात महिन्यापासून प्रतिदिन एक लाख रुपये दंड आकारणी सुरु आहे. आतापर्यंत सुमारे 2 कोटी 10 लाख रुपये दंडात्मक कारवाई झालेली आहे.

तसेच सदरील मलनिःसारण कामाचे सल्लागार युनिटी कन्स्ट्रक्शनचे महेश पाठक यांनाही महापालिकेने सोमवार (दि.2) नोटीस बाजवून सात दिवसात खुलासा मागविण्यात आला आहे. संबंधित सल्लागाराने त्या दुर्घटना झालेल्या स्थळाची पाहणी केलेली नसल्याचे माहिती समोर येत आहे.

दरम्यान, मलनिःसारण कामासाठी सब-ठेकेदार नियुक्ती केल्याने महापालिकेचे संबंधित अधिकारीही अडचणीत आले आहेत. या सब ठेकेदाराकडून सर्व कामे करुन घेतल्याचे माहिती अधिकारी व ठेकेदारानी महापालिका आयुक्तापासून दडविली आहे. त्यामुळे सदरील दुर्घटनेचे सखोल चाैकशी करण्यास द्वि सदस्य समिती नियुक्ती केली असून दोन दिवसात अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.

कासारवाडी व च-होलीतील दुर्घटनेत कारवाई नाहीच

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कासारवाडी येथे मलनिःसारण कामकाजास खोदाई करताना संरक्षण भिंती कोसळून एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता. या प्रकारात संबंधित मुलाच्या कुटूंबियाला आर्थिक मदत करण्यात आली. तर च-होली-आळंदी रस्त्याच्या शेजारी ड्रेनेज कामासाठी खोदाई केली होती. त्यात पडून एका मजूराचा मृत्यू झाला होता. या दोन्ही प्रकरणे महापालिकेचे अधिकारी-ठेकेदाराने संगणमताने दडपली आहेत. त्यात कोणावरही अद्याप कारवाई झालेली नाही. आयुक्तांनी नेमलेल्या चाैकशी समितीचा अहवाल देखील गुलदस्त्याच ठेवण्यात आलेला आहे. या प्रकरणातून अधिका-यांनी निष्काळजीपणा दाखवूनही कोणावर कारवाई झालेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button