breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस सरकारचा आज शपथविधी

बंगळूरू : धर्मनिरपेक्ष जनता दलाचे  (जेडीएस) नेते एच. डी. कुमारस्वामी आज (बुधवारी) कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर कुमारस्वामी यांच्यासोबत काँग्रेस नेते जी. परमेश्वर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांची सत्तावाटपासंदर्भात मंगळवारी बैठक झाली. या बैठकीनंतर कर्नाटक काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी, ‘३४ खात्यांपैकी २२ खाती काँग्रेसकडे, तर मुख्यमंत्रिपदासह १२ खाती जेडीएसकडे असतील असे सांगितले. दरम्यान, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रिपदावर काँग्रेसच्या आमदाराची निवड करण्यास जेडीएसचे नेते एच. डी. देवेगौडा यांना कोणताही आक्षेप नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button