breaking-newsराष्ट्रिय

अभिराम भडकमकर, प्रकाश खांडगे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार

  • सावनी शेंडे यांना उस्ताद बिस्मील्ला खॉं युवा पुरस्कार’ 

नवी दिल्ली – प्रसिद्ध नाट्य लेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, ज्येष्ठ नृत्यांगणा संध्या पुरेचा आणि तबला वादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना वर्ष 2017 चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सावनी शेंडे आणि आदित्य खांडवे यांची उस्ताद बिस्मील्ला खॉं युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

कला क्षेत्रात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या संगीत नाटक पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. अकादमीच्या इंफाळ (मनीपूर) येथे झालेल्या बैठकीत वर्ष 2017च्या नाट्य अकादमी पुरस्कारासाठी देशभरातील 42 कलाकारांची, तर उस्ताद बिस्मील्ला खॉं युवा पुरस्कारासाठी 34 कलाकारांची निवड करण्यात आल्याचे संगीत नाटक अकादमीच्या अधिकृत ट्‌वीटर हॅंडलहून सांगण्यात आले आहे.

संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांचा संगीत नाटक अकादमीतर्फे गौरव केला जातो. यावर्षी 2017च्या नाट्य अकादमी पुरस्कारासाठी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला या श्रेणींमध्ये देशातील एकूण 42 कलाकारांची निवड करण्यात आली आहे. यात नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द नाट्य लेखक अभिराम भडकमकर व नाट्य दिग्दर्शक सुनील शानभाग यांची निवड झाली आहे. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द तबलावादक योगेश सामसी, तर लोककलेतील योगदानासाठी लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांची संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 1 लाख रूपये रोख , ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ संध्या पुरेचा यांना फेलोशीप 
नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ संध्या पुरेचा यांना यावर्षी संगीत नाटक अकादमीची मानाची फेलोशिप जाहीर झाली आहे. 3 लाख रूपये रोख , ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द गयिका सावनी शेंडे व आदित्य खांडवे यांना 2017 चा उस्ताद बिस्मील्ला खॉं युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. 25 हजार रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दरवर्षी एका शानदार सोहळयात राष्ट्रपती यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि फेलोशीप प्रदान करण्यात येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button